Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारराष्ट्रिय

सेन्सेक्स तब्बल इतक्या अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारही…

डोनाल्ड ट्रम्प यांचे 500 टक्के टॅरिफबद्दल धक्कादायक विधान

राष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत असून त्यांच्या निर्णयाचा परिणाम थेट फक्त अमेरिकाच नाही तर जगावर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सर्वात अगोदर 50 टक्के टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण हा टॅरिफ लावल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या आैषधांवर त्यांनी तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला.

याचा थेट परिणाम भारतीय कंपन्यांना झाला. अमेरिकेच्या टॅरिफमधून भारत मार्ग काढत असतानाच दुसरीकडे भारताला मोठा इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारताने जर रशियाकडून होणारी तेल निर्यात पूर्णपणे बंद केली नाही तर त्यांच्यावर आम्ही 500 टक्के टॅरिफ लावू. दोन दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेतील चांगल्या संबंधांबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. मात्र, आता त्यांनी खळबळ उडवणारी भाष्य केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 टक्के टॅरिफबद्दल केलेल्या विधानानंतर भारतात मोठा गोंधळ उडाला. हेच नाही तर याचा थेट परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झाला असून थेट शेअर बाजार खाली आला. खास करून ऑईल कंपन्यांचे शेअर धडाधड पडताना दिसले. सलग चाैथ्या दिवसी शेअर बाजार पडल्याचे बघायला मिळतंय. यामुळे गुंतवणुकदाऱ्यांमध्येही मोठी चिंता बघायला मिळत आहे.

हेही वाचा –  उद्योगनगरीत लोकशाहीचा उत्सव, टाटा मोटर्समध्ये मतदानाची शपथ

सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी घसरणीसह गुरूवारी उघडला आणि बाजारात विक्रीवर थेट परिणाम बघायला मिळाला. दुपारी 2:30 वाजता सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी घसरून 84,360 अंकांवर व्यवहार करत होता. अंकांची घसरण तब्बल 26000 च्याही खाली आली. हा भारतीय शेअर बाजाराला अत्यंत मोठा धक्काच म्हणावा लागेल. तेल कंपन्यांचे शेअर पडताना दिसत आहेत.

मुळात म्हणजे भारत हा रशियाच्या तेल खरेदीचा अत्यंत मोठा ग्राहक आहे. अमेरिकेत सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025 नावाचे एक नवीन विधेयक सादर केले. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा अत्यंत मोठा डाव असल्याचे सांगितले जात असून यामुळे रशियाच्या तेलावरील दबाव अजून वाढेल असे सांगितले जात आहे. या विधेयकाच्या माध्यमातून अशा देशांवर मोठा टॅरिफ लावता येईल, जे देश रशियाकडून मोठ्या संख्येने तेल खरेदी करतात. ज्यामध्ये भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button