Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारराष्ट्रिय

पाकिस्तानचा अमेरिकेला धक्का; इराणसाठी ६ नवे भूमार्ग, होर्मुझ नाकेबंदीवर प्रश्नचिन्ह

इराणला दिलेल्या व्यापारमार्गांमुळे अमेरिकेच्या निर्बंध धोरणाला पाकिस्तानकडून आव्हान

लाहोर : शांतता चर्चेत मध्यस्थ म्हणून पुढे येणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त केला जात आहे. कारण, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी करून इराणवर आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असताना, पाकिस्तानने इराणला मदतीचा हात देत भूप्रदेशातून व्यापारासाठी सहा नवे मार्ग खुले केले आहेत.

या निर्णयामुळे इराणला रशिया, चीनसह इतर देशांशी व्यापार सुरू ठेवणे सुलभ होणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान सरकारने या सहा मार्गांची अधिकृत घोषणा केल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, अमेरिकेकडून पाकिस्तानच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ डेरेक ग्रॉसमन यांनी स्पष्ट शब्दांत टीका करत म्हटले आहे की, “या मार्गांमुळे अमेरिकेच्या निर्बंधांना फटका बसू शकतो आणि इराणला नाकेबंदी टाळून इंधन व्यापार सुरू ठेवणे शक्य होईल.”

हेही वाचा : गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद; फुकेतमध्ये गोवेकरांसाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी!

पाकिस्तानवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे. एकीकडे तो शांतता प्रक्रियेत मध्यस्थी करत असताना, दुसरीकडे इराणला मदत करत असल्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी इस्रायलनेही पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेबाबत शंका व्यक्त केली होती, आणि आता अमेरिकेकडूनही अशाच प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, इराणकडूनही सूचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “पाकिस्तान आमचा मित्र आहे, पण मध्यस्थ म्हणून योग्य नाही,” असे इराणच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एकूणच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना या निर्णयामुळे धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानने दिलेल्या या सहा मार्गांमुळे होर्मुझ नाकेबंदीचा परिणाम कमी होईल का, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button