NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलीज
नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा सध्या घेऊ नये अशी मागणी होत असतानाच NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज करण्यात आली आहेत. ही परीक्षा निर्धारीत वेळेत म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी होणार असून देशातील विवध शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित केली जाणार आहेत. दरम्यान, यंदा केंद्राची संख्या वाढवली आहे. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थिंना भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून दिलेल्या नियमांचं पालन करने गरजेचं आहे.
या लिंकवर जाऊन विद्यार्थी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतील.
https://ntaneet.nic.in/ntaneet/AdmitCard/AdmitCard.html
या वेबसाईटवर गेल्यानंतर Enter Application Number, Enter Password, Enter Date Of Birth (DOB), Enter Security Pin या डिटेल्स भरायच्या आहेत. त्यानंतर NEET Admit Card 2020 आपल्याला स्क्रिनवर दिसेल. तिथून ते आपल्याला डाऊनलोड करुन घ्यायचं आहे.
परीक्षेसाठी कडक नियम
परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवलं जावं, पाण्याची बॉटल स्वता आणावी तसेच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठी सेंटर्स वाढवले
जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.
जेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.
जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.





