Love Jihad: कायद्यात व्याख्या पण नाही नी एकही गुन्हाही दाखल नाही – केंद्र सरकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Love-Jihad.jpg)
‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला कायद्यात कोणतीही स्थान नसून आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांकडून एकही गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती, केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. केंद्रीय गृहराज्य मंत्री जी.किशन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखी प्रश्नाला रेड्डी यांनी उत्तर दिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणं समोर आली होती. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये अखिला अशोकन या हिंदू मुलीने मुस्लीम धर्म स्विकारत शफीजहाँ या व्यक्तीशी लग्न केलं होतं. अखिलाच्या पालकांनी याविरोधात लव्ह जिहादची तक्रार करत न्यायालयात धाव घेतली होती. काही कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं होतं, ज्यात न्यायालयाने अखिलाच्या बाजूने निकाल दिलेला होता. संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये गाजलेल्या एका प्रकरणात उच्च न्यायालयानेही हाच निर्वाळा दिला होता. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या संकल्पनेला कायद्यात स्थान नसल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं. मध्यंतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे (NIA) केरळमधील दोन प्रकरणांचा तपास करण्यात आला होता.