breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: नरेंद्र मोदींचं नेतृत्त्व जबरदस्त, अमेरिका तुमचे उपकार विसरणार नाही – डोनाल्ड ट्रम्प

करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याचासाठी मंजुरी मिळाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेता असल्याचं सांगितलं.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1247950299408498693

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button