breaking-newsआंतरराष्टीय

Corona Virus: फेसबुकचे लंडनमधील ऑफिस बंद, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

लंडन | महाईन्यूज

फेसबुकनेलंडनमधील तीन ऑफिस सोमवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. स्कायन्यूजच्या माहितीनुसार, फेसबुकने एका कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या 3000 कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. फेसबुकचा हा कर्मचारी सिंगापूर येथील होता. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा कर्मचारी लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता.

फेसबुकने म्हटले आहे की, ऑफिस सुरु करण्याआधी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. यासंदर्भात फेसबुकने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “आमच्या सिंगापूर येथील ऑफिमधील एका कर्मचाऱ्याला कोविड-19 (कोरोना व्हायरस) ची लागण झाल्याचे समजते. हा कर्मचारी 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान आमच्या लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता. दरम्यान, स्वच्छतेसाठी सोमवारपर्यंत लंडनस्थित ऑफिसेस बंद करत आहोत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घरातून काम करत आहेत.” ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकने अमेरिकेतील बे एरियामधील आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण, गुरुवारी सॅन फ्रॅससिस्कोमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच, फेसबुकने आपल्या सिएटल ऑफिस सुद्धा सोमवारपर्यंत बंद केले आहे. येथील एका कॉन्ट्रॅक्टरला कोरोना व्हायरची लागण झालेली आहे. याशिवाय, किंग काउंटी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांकडून 31 मार्चपर्यंत घरातून काम करून घेतले पाहिजे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button