Corona Update: महाराष्ट्रासह चार राज्यांत कोरोनाचा उतरता आलेख
![Corona update Maharashtra and four other states shows decreasing graph](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Maharashtra-Corona-Update.jpg)
मुंबईः देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा यात समावेश आहे. 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीतील कोव्हिड-19 चा आलेख उतरता असल्याचे दिसून आले आहे.
तर पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
![Corona Update Decline in Maharashtra and four other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-update-1024x730.jpg)
आरोग्य विभागाने यापुढेही कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा मास्कने किंवा रूमालाने झाकणे, सतत साबणाने हात धुणे, अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे, लक्षणे दिसत असेल तर लगेच स्वतःला विलगीकरण करून टेस्ट करून घेणे, असे नियम पाळावे.
अवश्य वाचाः कोरोना लस विक्री आधी भारतात नंतर जगभरात, जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसीचं लक्ष्य – आदर पुनावाला