जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, आयटीबीपीचे ६ जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Bus.png)
जम्मू-काश्मीर । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ६ आयटीबीपीच्या जवानांचा मृत्यू झाला आहे.
३९ जवानांपैकी ३७ आयटीबीपीचे तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती सिव्हिल बस होती आणि अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली.