Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी

‘हा तर मोदींचा धंदा’, नवाब मलिक यांचा घणाघात

मुंबई : निवडणुका आल्या किंवा भाजपा अडचणीत आली की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा करण्याचा धंदा पंतप्रधान मोदींनी सुरू केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

सहा हजार रुपये शेतकर्‍यांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवता, हे नक्की काय चाललंय? शेतकर्‍यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या संवादाला भाजपाचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीका मलिक यांनी केली.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून देखील मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्‍या भाजपने आधी स्वत:ची विश्वासार्हता दाखवावी, अशीही टीका त्यांनी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button