breaking-newsराष्ट्रिय
12 आणि 18 टक्क्यांचा स्लॅब रद्द?
![राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीत घट ; ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ७०० कोटी कमी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/gst.jpg)
नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे.
जीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्क्यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.