breaking-newsराष्ट्रिय

१ कोटी रुपये जिंका; केंद्र सरकारची मोठ्ठी घोषणा

नवी दिल्ली | महाईन्यूज

कोणत्याही दुकानातून खरेदी करताना पक्कं बिल घेण्यास विसरू नका कारण त्यामुळे तुम्ही एक कोटी रुपये सहज जिंकू शकता. वस्तुतः केंद्र सरकारने वस्तू व सेवा करामध्ये (GST) कोणताही गैरव्यवहार होऊ नये आणि होत असल्यास त्याला रोखण्यासाठी लॉटरी प्रणाली सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरु केले आहे. त्याअंतर्गत १ एप्रिलपासून दरमहा खरेदीचे प्रत्येक बिल लकी ड्रॉमध्ये समाविष्ट केले जाईल. या लॉटरीसंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, याअंतर्गत खरेदी करणार्‍याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळू शकते.

ते पुढे म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना पक्की बिले घेण्यास प्रोत्साहित केले जाईल, GST मध्ये गैरव्यवहार म्हणजेच करचुकवेगिरी करण्यास रोख लावण्यास सरकारला मदत होऊ शकेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात माहिती दिली होती की, या लॉटरी योजनेत दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत. जीएसटी परिषद आपल्या पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ शकते. परिषदेची पुढील बैठक १४ मार्च रोजी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button