breaking-newsआंतरराष्टीय

होs होss होsss… ओबामा झाले सांताक्लॉज; रुग्णालयातील मुलांना केले भेटवस्तूंचे वाटप

सध्या जगभरामध्ये नाताळ सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेकांनी तर आपल्या जवळच्या लोकांसाठी आत्तापासूनच भेटवस्तू खरेदी करुन ठेवल्या आहेत. याच सणानिमित्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काही लहान मुलांसाठी सांताक्लॉज झाले. वॉशिंग्टनमधील चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील लहान मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले.

२००९ ते २०१७ या कालावधीमध्ये दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या ओबामांची लोकप्रियता आजही अमेरिकेमध्ये कायम आहे. काल संध्याकाळी वॉशिंग्टनमधील रुग्णालयात अचानकच ओबामा यांचे आगमन झाले. त्यांनी डोक्यावर ख्रिसमसची सांताक्लॉज टोपी घातली होती तर पाठीवर भेटवस्तूंनी भरलेला झोला घेतला होता. याच अवतारात ओबांमांनी रुग्णालयात प्रवेश केला. ओबामांच्या आगमनाची बातमी रुग्णालयात वाऱ्यासारखी परसरली आणि अनेकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. ‘या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मला धन्यवाद सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. या भेटीमुळे मला लहान मुलांशी संवाद साधता आला याचा आनंद आहे’, असे मत ओबामा यांनी या भेटीदरम्यान नोंदवले.

लहान मुलांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांचे ओबामांनी गोडकौतूक केले. ‘दोन मुलींचा बाप असल्याने मला मुलांसाठी काळजी करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांच्या भावना समजू शकतात. हे सर्व लोक लहान मुलांची काळजी घेतात त्यांची योग्य त्यापद्धतीने देखभाल करतात हे खूप महत्वाचे आहे’ असे मत ओबामांनी केले आहे. ओबामांनी या भेटीमध्ये मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या, सेल्फीही काढले.

ट्विट करुनही त्यांनी सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

Barack Obama

@BarackObama

Merry Christmas and happy holidays to the extraordinary kids, families, and staff at Children’s National. And thanks for humoring me as your stand-in Santa.

Children’s National 🏥@childrenshealth

Thank you @BarackObama for making our patients’ day so much brighter. Your surprise warmed our hallways and put smiles on everyone’s faces! Our patients loved your company…and your gifts! https://www.instagram.com/p/BrlZliwBD8e/  ❤️ #HolidaysAtChildrens #ObamaAndKids

Embedded video

50.6K people are talking about this

२०१७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर ओबामा सत्तेमधून पायउतार झाले. तेव्हापासून ते वॉशिंग्टन येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहतात. मागील वर्षीही ओबामा यांनी सांताक्लॉजचा पेहराव करुन शहरामधील बॉइज अॅण्ड गर्ल्स क्लब या माध्यमिक शाळेला भेट देऊन मुलांना भेटवस्तूचे वाटप केले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button