हिज्बुलचा म्होरक्या ‘ओसामा’चा खात्मा, भाजपा नेत्याच्या हत्याप्रकरणात होता वाँटेड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/kashmir-terrorists.jpg)
महाईन्यूज | प्रतीनिधी
जम्मू-काश्मीरमध्ये तीन विविध भागांमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यामध्ये एकूण ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर एक जवान शहीद झाला आहे. यामध्ये ४ सुरक्षारक्षकही जखमी झाले.
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी सुमारे नऊ तास दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड असलेला हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचाचा प्रमुख कमांडर ‘ओसामा’चा सुरक्षा दलाने खात्मा केला. ओसामासह जाहिद आणि फारुख अशा अन्य दोन दहशतवाद्यांचाही खात्मा झाला. शनिवारी सकाळी राजमार्गाजवळ चकमकीनंतर पळ काढून हे तिन्ही दहशतवादी मुख्य बाजारातील एका घरात घुसले होते. तेथेच सैन्य दलाने तिघांना मारले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात (१ नोव्हेंबर २०१८) रोजी भाजपाचे वरिष्ठ नेते अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ अजित परिहार तसेच एप्रिल २०१९ मध्ये आरएसएस पदाधिकारी चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सेक्रेटरीची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणात ओसामाचा हात होता. ओसामावर अनेक लाखांचं इनाम होतं.