सेक्स करताना दरवाजा उघडा ठेवणाऱ्या जोडप्याची क्रुझवरुन झाली हकालपट्टी

बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात इक्वॅडोर देशात घडली. या घटनेची जगभरामध्ये चर्चा झाली. असं असतानाच आता पुन्हा एकदा सेक्स करताना मोठ्याने आवाज करण्या जोडप्यासंदर्भातील एक बातमी समोर आली आहे. कॅरेबियन बेटांवर एका क्रूझमध्ये मोठ्या आवाजात सेक्स करणाऱ्या जोडप्याची क्रुजवरुन हकालपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कॅरेबियन बेटांवर बार्बाडोस येथे रिनेट आणि व्होलकर हे जर्मन जोडपे दोन आठवड्यांसाठी पर्यटनाला गेले होते. दोन आठवड्यांच्या या भटकंतीच्या दुसऱ्याच दिवशी या दोघांना क्रूझवरील कर्मचाऱ्यांनी एका बेटावर उतरवले. माईन शीप फाइव्ह या क्रुजवर संपूर्ण प्रकार घडला आहे. हे जोडपे क्रूझवरील आपल्या रुममध्ये रात्री सेक्स करत असतानाच चुकून त्यांच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा राहिला. त्यामुळे रुममधून मोठ्याने होणाऱ्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार इतर सहप्रवाशांनी क्रूझ व्यवस्थापनाकडे केली. त्यानंतर त्याच रात्री उशीरा क्रूझवरील व्यवस्थापक आणि काही सुरक्षारक्षकांनी या दोघांना एका बेटावर उतरवले. ‘इतर प्रवाशांना त्रास झाल्याने तुम्हाला बोटीवरुन उतरवण्यात येत असल्याची कारवाई करावी लागत असल्याचे क्रुजच्या व्यवस्थापनाने या दोघांना कळवले. मात्र दरवाजा उघडा राहण्यामागे आमचा कोणताच दोष नसल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे. आम्ही खासगी क्षण अनुभवत असताना दरवाजा उघडा राहिल्याप्रकरणी आता या जोडप्याने कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तसेच कर्मचाऱ्यांनी अचानक आपल्याला क्रुजवरुन उतरवल्याने आम्ही एका बेटावर अडकून पडलो होतो. आमच्या बॅगा आणि सामानही आम्हाला देण्यात आले नाही असा आरोप या जोडप्याने केला आहे.





