Breaking-newsराष्ट्रिय

सीबीएसई; दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिका-याने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे 10वी आणि 12वीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button