सिंधु नदीच्या पाणी वाटपाबाबतची बोलणी फिसकटली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/indus-river-1-1.jpg)
- जागतिक बॅंकेने दिली माहिती
वॉशिंग्टन – जागतिक बॅंकेच्या पुढाकाराने भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधु नदीच्या पाणी वाटपाबाबत चर्चा घडवून आणण्यात आली पण या दोन दिवसांच्या चर्चेत काहीच तोडगा निघू शकलेला नाहीं असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. पाकिस्तानच्यावतीने ऍटर्नी जनरल अश्तर औसाप अली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या चर्चेत भाग घेतला.
जागतिक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टलिना जार्जिएव्हा आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानच्या विनंती नुसार ही चर्चा करण्यात आली. या पाणी वाटपाबाबतच्या विविध प्रस्तावांवर यावेळी चर्चा करण्यात आली पाकिस्तान पुढे हे सारे तोडगे ठेवण्यात आले परंतु त्यातून त्यांचे समाधान झाले नाहीं. तथापी जागतिक बॅंक दोन्ही देशांशी याविषयी सातत्याने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न जारीच ठेवली असे जागतिक बॅंकेच्यावतीने सांगण्यात आले.