breaking-news

‘सावित्रीबाई फुले’ला पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी देणार

कोल्हापूर | महाईन्यूज

शहरातील सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचाही समावेश आहे. या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. येथील पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, त्यांनी थेट रुग्णांशीही सुविधेबाबत विचारपूस केलेली आहे.

आमदार जाधव म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याचा खर्च पेलावत नाही. त्यांना शासकीय रुग्णालयेच आधारवड ठरतात. ही सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शहरातील सर्व रुग्णालयांना भेटी देत आहे. येथे कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती घेत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सावित्रीबाई रुग्णालयाला भेट दिलेली आहे. येथील रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही काम समाधानकारक आहे. काही मशिनरींची आणि साहित्याची आवश्यकता आहे. याची माहिती घेतली असून प्राधान्यक्रमानुसार साहित्याची यादी करण्याच्या सूचना रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामधील पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मशिनरी आणि स्वच्छतेला प्राधान्य असणार आहे. ही सर्व कामे सीएसआर फंड, आमदार फंडातून केली जाणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, दुर्गेश लिंग्रस, बंडा साळोखे, प्रा. पी. जी. मांगले, अवधूत भाट्ये, डॉ. प्रकाश पावरा, सुनील पाटील, दीपाली खाडे, अभिषेक साळोखे, दीपाली शिंदे, सुजित कुलकर्णी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button