सात मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधींची बैठक, उद्धव ठाकरेही उपस्थित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/SONIYA-GANDHI-METTINAG.jpg)
नवी दिल्ली – काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर येत असतानाच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सात विरोशी पक्षातील मुखमत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही सोबत मिळालीय. दोन्ही नेत्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) स्थगित करण्याची मागणी केलीय.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत सात विरोधी पक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची आज बैठक होतेय. या बैठकीला सोनिया गांधी यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेत हे काँग्रेसचे मुख्यमंत्री तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना), झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) हेदेखील सहभागी झालेत.