Breaking-newsराष्ट्रिय
सातवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, हातावर लिहिली सुसाईड नोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/suicide-2_20180477920.jpeg)
दिल्लीतील इंदरपुरी परिसरात राहणाऱ्या सातवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोटही लिहिली आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील शिक्षक तिला त्रास देत होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही नागपूर येथे बुधवारी अशीच एक घटना घडली होती. नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयातील एका १९ वर्षी विद्यार्थिनीने रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली होती. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांनी तिला ३५ हजार रुपये मागितल्यामुळे तिने आत्महत्या केली, असे समजते.