भारत वि. इंग्लंड चौथी टी-२० लढत आज पुण्यात रंगणार; जाणून घ्या कधी व किती वाजता

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघ या एकूण ५ टी २० सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. भारतीय संघाने मालिकेत सलग २ सामने जिंकले आहेत.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखली हे सामने खेळले जात आहे. त्यामुळे आता या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सामना कुठे आणि किती वाजता?
- ठिकाण : एमसीए क्रिकेट स्टेडियम पुणे
- वेळ : संध्याकाळी ७ वाजता
- लाईव्ह प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर
- मोबाईलवर : डिज्ने प्लस हॉटस्टारवर सामना पाहता येणार आहे.
भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.





