सलग १५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ
![Financial ruin to the common man; Diesel and petrol became more expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/petrol-pump.jpg)
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. देशात कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. त्यात भर म्हणजे पेट्रोल डिझेलचे सतत वाढणारे भाव सामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसवणारे आहेत.
दरम्यान पेट्रोलचे दर ८७ रूपयांवर पोहोचले आहेत, तर डिझेलचे दर ८० रूपयांच्या घरात पोहोचले आहे. रविवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ३५ पैसे तर डिझेलच्या दरांत ६० पैसे प्रती लिटर प्रमाणे वाढ केली आहे. या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोलचे दर ७.९७ रूपये तर डिझेल ८.८८ रूपयांनी वाढले आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७९.२३ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७८.२७ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ८६.०४ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७६.६९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे.
चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ८२.५८ रूपये आणि ८०.९५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७५.८० रूपये आणि ७३.६१ रूपये प्रती लिटर आहे. रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. देशात पेट्रोल आणि डिझेलवरील कर ६९ टक्के झाला आहे.