Breaking-news
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी वाढ केली. गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या आहेत.
गुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.





