Breaking-newsराष्ट्रिय
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/sharad-bobade.jpg)
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता.
राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर खात्याकडून मिळाली होती. बोबडे यांच्याही जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सरन्यायाधीशांना झेड दर्जाची सुरक्षा होती, त्यात आता वाढ करुन ती झेड-प्लस करण्यात आली आहे.