Breaking-newsराष्ट्रिय
सर्वोच्च न्यायालयाचा कुडनकुलम प्रकल्पाला दिलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Corbis_FotoSA_kudam-..jpg)
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अणू ऊर्जा निगम लिमिटेडला (एनपीसीआयएल) कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्गी आण्विक इंधनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी एप्रिल 2022 पर्यंतची मुदत दिली आहे. न्यायालयाने या अगोदर आण्विक इंधनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी 30 मेपर्यंतची मुदत दिली होती.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कंपनीची बाजू मांडली. किरणोत्सर्गी आण्विक इंधनाच्या सुरक्षित साठवणुकीची सुविधा निर्माण करण्यासाठी 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदत दिली जावी अशी मागणी त्यांनी केली होती.