breaking-newsआंतरराष्टीय

सईदने केले ईदच्या प्रार्थनेचे नेतृत्व

लाहोर – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी व अमेरिकेने फरार म्हणून घोषित केलेला दहशतवादी हाफिज सईद हा आज बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी प्रकटला. त्याच्या जमात उद दवा नावाच्या संघटनेने येथील एका स्टेडियमवर ईदच्या नमाजाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्याने त्याचे नेतृत्व करीत तेथे प्रवचनही दिले. त्याच्या या संघटनेवर पाकिस्तानात बंदी आहे.

जमात उद दवा ही संघटना अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे. त्याच्यावर अमेरिकेन एक कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस जाहीर केले आहे. जमात उद दवा ही लष्कर ए तोयबाची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. सईद हा आता पकिस्तानात सर्वत्र मोकाट हिंडत असून त्याने निवडणुकीच्या क्षेत्रात उतरून आपल्या पक्षाचे दोनशे उमेदवार संसदीय निवडणुकीसाठी उभे करण्याची घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button