Breaking-newsआंतरराष्ट्रीय
इमरान खानच्या विरोधात 97 वर्षीय हजरत बिबी निवडणूक लढवणार

बानू (पाकिस्तान) – माजी क्रिकेटपटू आणि पीटीआय (पाकिस्तान तहरीक ए इन्साफ) पक्षाचे नेते इमरान खान यांच्या विरोधात बानू येथे 97 वर्षीय हजरत बिबी निवडणूक लढवणार आहेत. इमरान खान एकूण पाच मतदार संघांतून निवडणूक लढवत असून एनए-35 बानू हा त्यापैकी एक मतदार संघ आहे. ते निवडणूक लढवत असलेले बाकी मतदार संघ पुढीलप्रमाणे आहेत-कराची, लाहोर, रावळपिंडी आणि मियांवली.
हजरत बिबी यांऩा निवडणूक लढवण्याचा चांगलाच अनुभव आहे. या पूर्वी पाच वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. या वेळी त्यांनी दोन मतदार संघांतून नामांकन दाखल केले आहे. 11,67, 892 लोकसंख्या असलेल्या बानो मतदार संघात हजरत बानू बिबी नावाने प्रसिद्ध आहेत. निवडणूक जिंकून जनतेच्या भल्याचे काम करण्याची आणि विशेषकरून मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.





