Breaking-news
श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Sridevi-.jpg)
नवी दिल्ली : दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या स्वतंत्र चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. चित्रपट निर्माता सुनिल सिंह यांनी ही याचिका केली होती. दुबईत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं होतं, त्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
सुपरस्टार ‘श्रीदेवी’ यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले.