breaking-news

शिवसेनेच्या भगव्याचा रंग फिका पडलाय- देवेंद्र फडणवीस

नागपूर | महाईन्यूज

कधीकाळच्या आमच्या मित्रपक्षाने आता रंग बदलला आहे. त्याच्या भगव्या रंगावर दुसऱ्या पक्षाचा रंग चढलेला आहे. त्यामुळे भगव्याचा रंग आता फिका पडला आहे. आमचा रंग बदललेला नाही, असे म्हणणारी शिवसेना राष्ट्रपुरुषांचा अपमान होत असताना चूप का आहे? सत्तेच्या दडपणाखाली शिवसेना वावरत आहे, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला आहे.

नागपूर शहर व जिल्हा भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार कोण चालवत आहे, हे समजत नाही. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे. रिमोटच्या बॅटºया दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एक बोलतात, सिल्व्हर ओक दुसरे बोलतात, दिल्लीतून तिसरेच बोलले जाते, अशी अवस्था चालू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला कौल दिलेला आहे. मात्र आमच्याशी छळ झाल्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागत आहे. पण आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button