शिकार प्रकरणात प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/randhawa-jyoti.jpg)
शिकार प्रकरणात उत्तर प्रदेशच्या वन खात्याने आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावा याला अटक केली आहे. कातरनिया घाटचे डीएफओ आणि त्यांची टीम चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई करेल. ज्योती रंधावा आणि त्याची साथीदार महेश विराजदार यांना मोतीपूर रेंजमधून अटक करण्यात आली.
ज्योती रंधावाची गाडी एचआर २६ डीएन ४२९९, शस्त्रास्त्र आणि अन्य साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे. रंधावाच्या गाडीमध्ये डुक्कराची कातडी, शस्त्र आणि दुर्बिण सापडली. रंधावाने मंगळवारी रानकोंबडयाची शिकार केल्याची चर्चा आहे.
कतारनियाघाट मोतीपूर येथे रंधावाच्या मालकीचे फार्म आहे अशी माहिती दुधवाचे फिल्ड डायरेक्टर रमेश पांडे यांनी दिली. मागच्या तीन दिवसांपासून ज्योती रंधावा त्याच्या गाडीमधून या भागात फिरत होता. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. मंगळवारी सकाळी तो जंगलामध्ये फिरत होता. अलीकडेच ज्योती रंधावाने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली होती.
ज्योती रंधावाचे बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगसोबत लग्न झाले होते. पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. चित्रांगदाने गोल्फपटू ज्योती याच्याशी २००१साली विवाह केला होता. त्यांना पाच वर्षांचा झोरावर रंधावा हा मुलगा आहे.