breaking-newsआंतरराष्टीय

व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची इफ्तार पार्टी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाउसमध्ये पहिल्यांदाच इफ्तार पार्टी आयोजित केली. या कार्यक्रमावेळी त्यांनी मुस्लीम समुदायाला देश-जगाची सुरक्षा आणि समृद्धीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या पुढाकाराने सर्वांना चकीत केले. ट्रम्प प्रामुख्याने मुस्लीमविरोधी विधाने आणि निर्णयांसाठी चर्चेत राहिले आहेत.

मागील वर्षी त्यांनी सुमारे 3 दशकांपासून सुरू असलेली वार्षिक इफ्तार पार्टीची परंपरा संपुष्टात आणली होती. 1990 च्या दशकात बिल क्लिंटन यांनी व्हाइट हाउसमध्ये इफ्तार पार्टीची औपचारिक सुरुवात केली होती. यंदा ट्रम्प यांनी जगभरातील मुस्लिमांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अध्यक्ष या नात्याने पहिला विदेश दौरा मुस्लीम देशाचा केल्याबद्दल मला गर्व आहे. तेथे मुस्लीम बाहुल्य असणाऱया 50 हून अधिक नेत्यांच्या संबोधित केले होते. मागील वर्षी जी भागीदारी आणि एकजूटता निर्माण झाली, ते काळानुसरा आणखीन दृढ झाल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी स्वतःच्या पहिल्या विदेश दौऱयासाठी सौदी अरेबियाची निवड केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button