breaking-newsराष्ट्रिय

विक्रम मिस्त्री भारताचे चीनमधील पुढील राजदूत

नवी दिल्ली – वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विक्रम मिस्त्री यांची भारताचे चीनमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ते गौतम बंबवाले यांची जागा घेतील. मिस्त्री सध्या भारताचे म्यानमारमधील राजदूत म्हणून कार्य करत आहेत. मागील वर्षीचा डोकलाम पेच विसरून भारत आणि चीन द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अशावेळी मिस्त्री यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) 1989 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयात आणि परराष्ट्र मंत्रालयात विविध प्रकारची जबाबदारी सांभाळली. याशिवाय, युरोप, आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय दूूतावासांमध्ये कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button