लातूरमध्ये मनसेच्या वतीने खड्ड्यात रक्तदान करून आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/mns.jpg)
लातूर – लातूर-नांदेड महामार्गावर खड्डेच-खड्डे पडले असल्याने खड्ड्यात रस्ता आहे का? रस्त्यात खड्डा आहे हे नागरिकांना समजत नाही. दररोज या महामार्गावरून चाकुरवरून लातूरला जाणाऱ्याची संख्या जास्तीची आहे. रस्त्यामध्ये खूप खड्डे झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच या रस्त्यावरून लातूरला जाण्यासाठी अनेक खड्ड्यांचा सामना करत, नागरिकांना प्रवास करावे लागत आहे.
त्यामुळे काहींना मणक्याचे त्रास झाले आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. मनसेच्या वतीने अनेक वेळा निवेदनही देण्यात आले. पण त्यांच्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. म्हणुन या खड्ड्यांमुळे अपघात होऊन कित्येक जणांचे रक्त गेले आहेत. त्यासाठी रक्तदान करून मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवावेत यासाठी मनसेच्या वतीने चाकूर येथे खड्ड्यात रक्तदान करून प्रशासनाचा जाहीर निषेधही करण्यात आला.