लंडनला बनवणार मोस्ट वॉकेबल सिटी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/london-6.jpg)
लंडन – लंडन शहराला मोस्ट वॉकेबल शहर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीची कृती योजना जाहीर करण्यात आली आहे. लंडनचे महापौर सादिक खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्लॅन तयार केला आहे. शहरवासियांना अधिकाधिक रस्त्यावरून चालण्याची संधी यानिमीत्ताने दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशस्त पदपथ शहरभर तयार केले जाणार आहेत.
चालणे अधिक आनंददायी करण्यासाठीही त्यात अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. लोकांनी आपल्या मोटारगाड्या घरातच सोडून रस्त्यावर मोकळेपणाने चालण्याचा आनंद लुटावा अशी ही मूळ योजना आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होऊन शहरातील प्रदुषणही कमी होईल असा प्रयत्न यानिमीत्ताने केला जाणार आहे.
प्रत्येक लंडन शहरवासिय जर रोज वाहन सोडून 20 मिनीटे चालला किंवा त्याने सायकलिंग पसंत केली तर पुढील 25 वर्षात शहरवासियांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्चात तब्बल 1.7 अब्ज डॉलर्सची बचत होईल असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. लंडनमधील सुमारे 85 हजार लोकांना खुब्याच्या वेदनांचा आजार आहे. 19200 लोकांना डिमेंशियाचा आजार आहे, तर 18800 लोकांना डिप्रेशनचा विकार आहे. हा न चालण्याचा परिणाम आहे. लंडनमधील 34 टक्के लोक सध्या 20 मिनीटे सायकलिंग किंवा चालण्याचा उपक्रम करीत आहेत. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवण्याची ही योजना आहे.