रूग्णावर उपचार करताना ‘निपाह’ व्हायरसचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nipah1-.jpg)
कोझिकोड : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पेरांबरा तालुका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या लिनी (वय ३१ ) नावाच्या नर्सचाही समावेश आहे. निपाहचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होऊ नये यासाठी लिनी यांनी स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवले होते.
रूग्णांवर उपचार करतानाचं लिनी यांना निपाहचा संसर्ग झाला होता. लिनी यांनी निपाह व्हायरसची लागण झालेल्या एका तरूणावर उपचार केले होते पण नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळेच तिला संसर्ग झाला असावा, असं त्यांचे मामा वी बालन यांनी म्हटलं. लिनीला सिद्धार्थ (वय ५), रितुल (वय २) अशी दोन मुलं आहेत. लिनी यांनी त्यांच्या पतीसाठी लिहिलेलं होतं. ‘मी तुम्हाला आता भेटीन असं मला वाटत नाही. मुलांची काळजी घ्या. तुमच्याबरोबर मुलांनाही बाहेरगावी घेऊन जा. व माझ्या वडिलांप्रमाणे एकट राहू नका’, असं पत्र त्यांनी लिहिलं होतं.