राजस्थानातील गुर्जर समाज आंदोलन तात्पुरते स्थगित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/gurjar-1-.jpg)
जयपूर: राज्य शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर राजस्थानातील गुर्जर समाजाचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. येत्या २३ मे रोजी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन होणार होते. समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थान राज्य सरकारने सुटकेचा निश्वास सोडला आहे. रोहिणी आयोगाचा अहवाल आल्यानंतर काहीतरी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे, असे गुर्जर समाज आंदोलनाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
गुर्जर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर जाब विचारण्यासाठी समाजाचे नेते कर्नल किरोड़ी सिंह बैंसला यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शासनाच्या भेटीला आली होती. त्यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना राज्य सरकारने त्या नेत्यांना आश्वासन दिले आहे. रोहिणी आयोगाचा अहवाल आल्यानंतर काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या नेत्यांना देण्यात आले आहे.