Breaking-newsआंतरराष्ट्रीय
रशियाचे हेलिकॉप्टर कोसळून 18 ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/helicpter.jpg)
मॉस्को – रशियाचे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्ये 18 जण ठार झाले आहेत. हे हेलिकॉप्टर उत्तरेकडील सायबेरियामधील तेल साठ्यांच्या दिशेने जात असताना वाटेतच कोसळले.
“एमआय-8′ बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये 3 कर्मचाऱ्यांसह 15 प्रवासी होते. एका अन्य हेलिकॉप्टरमधून वाहून नेल्या जात असलेल्या मशिनरीला या हेलिकॉप्टरची धडक बसली आणि ते कोसळले.
उड्डाण केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये ते अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरला धडकेले दुसरे मालवाहू हेलिकॉप्टर मात्र सुखरुपपणे जमिनीवर उतरले. हा अपघात झाला तेंव्हा हवामान सर्वसामान्य होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.