Breaking-news
रजनीकांत यांच्या पक्षस्थापनेला लागणार आणखी विलंब
चेन्नई – सुपरस्टार रजनीकांत यांनी आज त्यांच्या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आणखी विलंब होणार असल्याचे संकेत दिले. अर्थात, आपला राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर तामीळनाडूतील जनतेचा चांगला काळ येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून रजनी यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगत असत. अखेर मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा इरादा जाहीर केला.
मात्र, अजूनही त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केलेली नाही. त्याविषयी राजकीय क्षेत्राबरोबरच तामीळनाडूमधील जनतेत मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षाच्या स्थापनेबाबत तामीळनाडूतील आणखी एक सुपरस्टार कमल हासन यांनी रजनी यांच्यावर आघाडी घेतली आहे. कमल यांनी काही महिन्यांपूर्वीच स्वत:च्या पक्षाची स्थापना केली आहे





