यापुढे डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करता येणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donald-trump-1.jpg)
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर कुणालाही ब्लॉक करू शकत नाहीत. बुधवारी स्थानिक न्यायालयाने तसा आदेश दिला आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणालाही ट्विटरवर ब्लॉक केले तर ते संविधानाचे उल्लंघन असेल, असेही न्यायालयाने म्हटले. 2017मध्ये काही ट्विटर फॉलोअर्सने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युजर्सला ट्विटरवर ब्लॉक केल्यावर त्यांनी याचिका दाखल केली होती.
अमेरिकेच्या नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प जर त्यांचे ट्विट पाहण्यापासून थांबवत असतिल तर ते संविधानाचे उल्लंघन असेल, असे फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश नाओमी रीस बुचवॉल्ड यांनी सांगितले. सोशल मीडिया हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कुणालाही ब्लॉक करू शकत नाही. ट्विटवर कुठल्याही युजरला ब्लॉक करणे म्हणजे ते त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले.
एखाद्या मुद्द्यावर किंवा प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याला महत्त्व देतात, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले. जर युजर्सच्या ट्विट किंवा रिट्विटमुळे तुमचे लक्ष विचलित होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. युजरला ब्लॉक करणे उपाय नसून ते संविधानाचे उल्लंघन मानले जाईल, असे न्यायालयाने म्हटले.