breaking-newsराष्ट्रिय

“मोदीजी फोटो कमी काढा, अभिजित बॅनर्जींना ऐका आणि काम करा”

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. सध्या भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही शरसंधान केलं आहे.

भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना ‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ यासाठी नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं होतं. “सध्या भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. विकासदराची आकडेवारी पाहिली तर आगामी काळात काही सुधारणा होईल. याबद्दल विश्वास व्यक्त करू शकत नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत आम्ही तेजी पाहिली. मात्र आता हा विश्वास व्यक्त करू शकत नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

नोबेल मिळाल्याबद्दल राहुल गांधी यांनी अभिजित बॅनर्जी यांचं अभिनंदन करतानाच पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. “अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांचं अभिनंदन. अभिजित यांनी भारतातील दारिद्र नष्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची क्षमता असणाऱ्या ‘न्याय’ संकल्पनेची मांडणी करताना मदत केली. पण, त्याऐवजी अर्थव्यवस्था नष्ट करून दारिद्रय वाढवणारे मोदीनॉमिक्स आता आपल्याकडे आहे,” असं राहुल म्हणाले होते.

Kapil Sibal@KapilSibal

Is Modiji listening ?

Abhijit Banerjee :

1) Indian economy on shaky ground
2) “ political interference “ in statistical data
3) Average urban and rural consumption gone down – hasn’t happened since the seventies
4) We in (India) are in crisis

Attend to work
Less photo-ops३,५४२८:३९ म.पू. – १५ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१,२४४ लोक याविषयी बोलत आहेत

त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. “मोदीजी ऐकत आहेत का? अभिजित बॅनर्जी काय म्हणत आहे, असं म्हणत सिब्बल यांनी बॅनर्जी यांचे मुद्दे मांडले आहे. आकडेवारी राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. गेल्या सत्तर दशकात न घटलेला ग्रामीण आणि शहरी उपभोग कमी झाला आहे. भारत भयंकर संकटात आहे. त्यामुळे फोटो कमी काढा आणि काम जास्त करा,” असा सल्ला सिब्बल यांनी मोदींना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button