‘मोदींनी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जे केलं तेच दिल्लीत दिसतंय’- इम्रान खान
इस्लामाबाद | महाईन्यूज
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्ली हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणेच मोदी हे नाझीवादाचं अनुकरण करुन आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचं इम्रान यांनी म्हटलेलं आहे. जर्मनीत नाझीने ज्याप्रमाणे अत्याचार केला होता, तसाच प्रकार दिल्लीतील हिंसारातील घटनांचे फोटो पाहून दिसत आहे. जगाने मोदींची ही कट्टरतवादी प्रतिमा स्विकारयला हवी, असेही खान यांनी म्हटलेले आहे.
ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या हिंसाचारावर इम्रान खाननेही मोदींना जबाबदार धरले असून 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणेच दिल्लीचाही हिंसाचार असल्याचे इम्रान यांनी म्हटलेले आहे. तर, मोदी हे नाझीप्रमाणे आणि हिटरलच्या पद्धतीने वागत असल्याचा गंभीर आरोपही इम्रान यांनी केलेला आहे.