Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीम, नव्या 13 मंत्र्यांचा समावेश

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात केला. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 13 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. 13 जणांमध्ये आठ जण कॅबिनेट मंत्री असतील तर पाच जण राज्यमंत्री असतील.

शपथविधीचा पहिला मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दुसरा क्रमांकावर शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिसरी क्रमांकावर आशिष शेलार यांनी शपथ घेतली. नवीन सदस्यांचा शपथविधी समारंभ राजभवनाच्या प्रांगणात झाला.

जयदत्त क्षीरसागर शपथ घेताना ‘आवाज कोणाचा शिवसेनेचा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. जयदत्त क्षीरसागर त्यांचे कुटूंबीय आणि समर्थक मोठ्या संख्येने आले आहेत. यानंतर शेलारांच्या वेळीही ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, विखे पाटील यांना सार्वजनिक बांधकाम, आशिष शेलार यांना गृहनिर्माण, अनिल बोंडे यांना कृषी, डॉ. संजय कुटे यांना समाज कल्याण, सुरेश खडे यांना आदिवासी विकास, अशोक उईके यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार आहे.

दुसरीकडे प्रकाश मेहतांसह या मंत्र्यांची राजीनामे..

प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – भाजप

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button