मेट्रो स्टेशनवर प्रेमी युगूलांचे अश्लील चाळे, व्हिडिओ लिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/cctv.jpg)
हैदराबादमधील मेट्रो स्टेशनवर प्रेमी युगूलांनी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टेशनच्या लिफ्टमध्ये अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ लिक झाले असून आता या प्रकरणाची हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडतर्फे चौकशी सुरु करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून व्हिडिओ लिक कसे काय झाले, असा सवाल विचारला जात आहे.
हैदराबादमधील मेट्रो स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. स्टेशनवरील लिफ्टमध्येही सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. लिफ्टमध्ये प्रेमी युगूल अश्लील चाळे करताना या कॅमेऱ्यात कैद झाले. अशा तीन प्रेमी युगूलांचे व्हिडिओ लिक झाले असून या सर्व प्रकरणाची मेट्रो प्रशासनाने दखल घेतली आहे. नियंत्रण कक्षातून व्हिडिओ लिक कसे झाले, याचा तपास केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रेमी युगूल लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील मेट्रोमधील प्रेमी युगूलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात सीआयएसएफ वगळता अन्य कर्मचाऱ्यांना तिथे प्रवेश देऊ नये, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.