Breaking-newsराष्ट्रिय
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदींचा संवाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/mudra-bank-6.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले की बॅंका आणि वित्तीय संस्थांनी या योजनेअंतर्गत आत्ता पर्यंत 12 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 6 लाख कोटी रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. त्यातील 9 कोटी म्हणजेच 74 टक्के लाभार्थी या महिला आहेत आणि त्यातील 55 टक्के लोक अनुसुचित जातीजमाती किंवा ओबीसी वर्गवारीतील आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 8 एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू केली असून त्यात हे स्वताचे व्यवसाय सुरू करू इच्छिणारांना दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेतून अनेकांना लाभ झाला असून अनेकांनी स्वताचे व्यवसाय यशस्वीपणे सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे.