मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/1993-Mumbai-blasts.jpg)
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.
खुर्शीद आलम याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर भारतात पसार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात नेपाळचा एक पोलीस हवालदारही जखमी झाला आहे. सदर हवालदाराने भारत-नेपाळ सीमेवर दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोरांनी हवालदारावरही गोळ्या घातल्या.
बाटला चकमकीतील फरार दहशतवादी शहजाद पप्पू याच्या अटकेनंतर आलमचे नाव समोर आले होते. खुर्शीद आलम हा आयएसआयसाठी काम करीत होता. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बाटला चकमकीनंतर फरार झाल्यानंतर खुर्शीदने पासपोर्ट तयार केला होता. तो आयएसआयचा हस्तकही होता.