Breaking-newsराष्ट्रिय
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसांच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pranav-m-1.jpg)
नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली आहे. फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मीच्या हॉस्पिटलने आज (३१ ऑगस्ट) मेडिकल बुलेटिन दरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे ते अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.
“कालपासून मुखर्जी यांची प्रकृती खालावत आहे. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने ते सध्या सेप्टिक शॉकमध्ये आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत,” अशी माहिती रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे.