महादान; तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरात एक कोटींचे दान अर्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/tirupati-mahadan.jpg)
तिरुमला: भगवान व्यंकटेश्वराच्या भक्ताने आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात तब्बल एक कोटींचे दान अर्पण केले आहे. हैदराबादचे उद्योगपती बी.करुणाकर रेड्डी यांनी बुधवारी तिरुमाला तिरुपति देवस्थान (टीटीडी) एसवी विद्याना ट्रस्टला १,००,००,११६ रूपये दान केले आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत व्यंकटेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर रेड्डी यांनी देवस्थानाचे पदाधिकारी केएस श्रीनिवास राजू यांच्याकडे चेक सुपूर्त केला.
मागील आठवड्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि आरएस ब्रदर्स शोरूमचे मालक व्यंकटेश्वरु यांनी देखील याच मंदिरात एक कोटी ६० लाखांचे दान अर्पण केले होते. व्यंकटेश्वरु यांनी दान केलेल्या रकमेचा उपयोग ‘आरोग्यवारा प्रसादिनी’या योजनेसाठी खर्च करावा अशी विनंतही देवलस्थानाला केली होती.
या व्यतिरीक्त भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था देवस्थानाकडून करण्यात आली आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत दुस-या क्रमांकावर असून फक्त लाडूंचा प्रसादाची विक्री करून या मंदिराला ७५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळते तर वर्षाला ६०० कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते.