Breaking-newsआंतरराष्ट्रीय

महात्मा गांधींना अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा प्रस्ताव

वॉशिंग्टन – महात्मा गांधींना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. शांती आणि अहिंसा यासाठी महात्मा गांधींचे महान कार्य पाहता त्यांना “कॉंग्रेशनल गोल्ड मेडल’ ने सन्मानित केले पाहिजे असे अमेरिकन सांसदांचे म्हणणे आहे. सांसद कॅरोलिन मॅलोनी यांनी यासाठी 23 सप्टेंबर रोजी प्रतिनिधी सभेत प्रस्ताव क्रमांक एचआर-6916 सादर केला होता. त्याला मूळ भारतीय असलेल्या चार सांसदाचे अनुमोदन आहे. हा प्रस्ताव आवश्‍यक कारवाईसाठी वित्तीय सेवा समिती आणि सदन प्रशासन समितीकडे पाठवण्यात आला आहे.

अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आजवर फार कमी परदेशी व्यक्तींना देण्यात आला असून एकाही भारतीयाला आजवर हा सन्मान मिळालेला नाही. कॉंग्रेशनल गोल्ड मेडल मिळालेल्या परदेशी व्यक्तींमध्ये मदर टेरेसा (1997), नेल्सन मॅंडेला (1998), पोप जॉण्‌ पॉल, द्वितीय (2000), दलाई लामा (2006), आंग सान स्यू ची (2008), मोहम्मद युनूस (2010) आणि शिमॉन पेरेज (2014) यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button