breaking-newsआंतरराष्टीय

भारत-अमेरिका भाई-भाई, ट्रम्प यांचा नवा नारा

इराणकडून तेल खरेदी न करण्याच्या मुद्यावर भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिका संतुष्ट असून त्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारताचे कौतुक केले आहे. इराणवरील निर्बंधात “भारतासारख्या चांगल्या मित्राकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी आहोत” असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. भारताला मोठया प्रमाणावर तेलाची आवश्यकता आहे. इराण बरोबर भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत पण अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी भारताने इराणकडून तेल आयात मोठया प्रमाणात कमी केली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांच्यावर निर्बंध लादले असून त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे.

अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले असून सहकारी देशांना इराणकडून तेल आयात बंद करण्यास सांगितले होते. सुरुवातीचे काही महिने अमेरिकेने भारतासह अन्य देशांना इराणकडून तेल खरेदीमध्ये सवलत दिली होती. पण सहा महिन्यांनंतर ही सवलत बंद करण्यात आली. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी इराणवर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव सहकारी देशांना आणि कंपन्यांना करुन देत आहेत.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. कारण तेल इराणचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. भारताने तेल खरेदी सुरु करावी यासाठी इराणचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी इराणने अनेक सवलती देण्याचीही तयारी दाखवली आहे. पण भारताने अजूनपर्यंत अमेरिकेला दुखावणारा निर्णय घेतलेला नाही. भारताला तेलाची मोठया प्रमाणावर गरज आहे. इराणकडून तेल खरेदी बंद केल्यामुळे फटका बसू शकतो. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारताने आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करुन देण्याचे अमेरिकेने आश्वासन दिले होते. सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. मागच्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button