Breaking-newsआंतरराष्ट्रीय
भारतीय शांतीसेनेच्या सुदान मधील कार्याचे कौतुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/uno-.jpg)
संयुक्तराष्ट्र – सुदान मध्ये तैनात असलेल्या भारतीय शांतीसेनेने तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल संयुक्तराष्ट्रांने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तेथील एक दुर्लक्षित विमानाची धावपट्टी आणि अन्य पायाभूत सुविधा भारतीय शांतीसैन्याने योग्यपणे कार्यरत केल्या आहेत.
मलाकल येथील विमानतळाच्या धावपट्टीवर झुडपे वाढली होती. आणि त्याची बरीच मोडतोडही झाली होती. शांतीसेनेने त्याची पुर्ण दुरूस्ती केली आहे. त्यामुळे ही धावपट्टी लवकरच वापरात येणार आहे. वास्तविक शांतीनसेनेला तेथे जे काम देण्यात आले आहे त्यात या कामाचा समावेश नव्हता परंतु तरीही भारतीय जवानांनी स्वताहून हे काम हाती घेऊन धावपट्टी पुन्हा वापरण्यायोग्य केली आहे. त्या कामाचा संयुक्तराष्ट्रांनीही दखल घेतली आहे.