भारतीय बिगर बासमती तांदळासाठी चीनमध्ये उघडणार दालन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rice-1-6.jpg)
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट दिली होती. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. आता भारतीय बिगर बासमती तांदळाला चीनमधील बाजारपेठ खुली होणार आहे.
चीनने आपल्या बाजारातील तूट भरून काढण्यासाठी काही कठोर पावले उचलली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच नवी दिल्ली येथील बाजारात बिगर बासमती तांदळाची पीछेहाट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालाला योग्य भाव मिळत नव्हता. पण, आता लवकरच बिगर बासमती भारतीय तांदूळ चीनमध्ये जाणार आहे.
परदेशी पाळीव प्राण्यांना कुठलाही धोका होणार नाही, याची शाश्वती मिळाल्यानंतर बीजिंगने परवानगी दिली आहे. बिगर बासमती तांदळापासून तयार होणाऱ्या खाद्याची तपासणी करण्यासाठी चीनने एक समिती भारत भेटीवर पाठवण्यासाठी समर्थन दर्शवले होते. यामुळे भारतीय तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे